सात अधीक्षक व वरिष्ठ लिपिकांचा खांदेपालट

सात अधीक्षक व वरिष्ठ लिपिकांचा खांदेपालट

विरार:वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘ए`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांच्यासह अन्य सहा अधीक्षक व वरिष्ठ लिपिकांना कामाच्या सोयीच्या दृष्टीने खांदेपालट देण्यात आला आहे. अतिरिक्त रमेश मनाळे यांच्या आदेशात हे बदली आदेश काढण्यात आले असून; केवळ कायम संवर्गातील कर्मचाऱ्यांची यात बदली करण्यात आलेली आहे.

या बदली आदेशानुसार, मुख्यालयातील माहिती अधिकार विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक निलेश पाटील यांना प्रभाग समिती ‘अ` बोळींज येथे बदली देण्यात आलेली आहे. प्रभाग समिती ‘डी` आचोळे येथील वरिष्ठ लिपिक राजेंद्र राऊत यांना मुख्यालय विद्युत विभागात नियुक्ती देण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन प्रभाग समिती ‘बी` येथे कार्यरत वरिष्ठ लिपिक हरिश्चंद्र बेंडू जाधव यांना मुख्यालयातील समाज कल्याण विभागात पाठविण्यात आले आहे. प्रभाग समिती ‘आय`मधील विद्युत, सार्वजनिक बांधकाम, दैनिक बाजार आवक-जावक, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, दूरध्वनी, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व दक्षता विभागाचे काम वरिष्ठ लिपिक यशवंत पाटील पाहत होते. त्यांची रवानगी सर डी. एम. पेटील रुग्णालय वसई येथे करण्यात आलेली आहे. 

दरम्यान; प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभाग समिती ‘एफ`मध्ये कार्यरत असलेले अधीक्षक गणेश हिलाल पाटील यांची नियुक्ती मुख्यालयातील क्रीडा व सांस्कृतिक विभागात करण्यात आली आहे. सुरेश पाटील हेदेखील नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना वृक्षप्राधिकरण व उद्यान विभागात पदस्थापना देण्यात आलेली आहे. तर प्रभाग समिती ‘सी`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना मुख्यालयातील जाहिरात व शिक्षण विभागात नियुक्त करण्यात आलेले आहे.

आदेश मिळताच; बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन संबंधित उपायुक्त परिमंडळ 1 व 3, 4, उपायुक्त विद्युत, समाज कल्याण मुख्यालय, प्रभारी वैद्यकीय आरोग्य, उपायुक्त वैद्यकीय आरोग्य, उपायुक्त जाहिरात विभाग, शिक्षण विभाग, उपायुक्त वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग यांच्यासोबत त्वरित संपर्क साधून त्यांच्या निर्देशानुसार कामकाजास सुरुवात करावी, असे या सर्वांना बजावण्यात आलेले आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास अथवा विनापरवानी परस्पर रजेवर गेल्यास शिस्तभंगाची कार्यवाही  केली जाईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow