सिन्नर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत.

सिन्नर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत.

सिन्नर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बदलापुरात चार वर्षांच्या चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं आणि संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवर खिळल्या होत्या. बदलापुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाहीत, तोच नाशकातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. नराधमाने चार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयिताने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुलीची सुटका केली. याप्रकरणी आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे (वय 26) याला पोलिसांनी अटक केली आहे. 19 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडल्याचं समजलं आहे. फिर्यादीनुसार तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा 351/2024, 137(2), 64(1), 65(2) प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow