सोसायटीच्या सांडपाण्याच्या टाकीत पडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

वसई: सोसायटीत आवारातील सांडपाण्याच्या टाकीत पडून सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अफिफा मौलाना (७) असे मयत मुलीचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रिलायबल सोसायटीत ही दुर्घटना घडली.
अफिफा ही बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सोसायटीच्या आवारात खेळत होती.जवळच सांडपाण्याची टाकी होती. मात्र त्या टाकीवर झाकण गंजल्याने खिळखिळे झाले होते. अफिफाचा पाय या झाकणावर पडला आणि ते निखळल्याने अफिळा टाकीत पडली.तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत आफिफाच्या वडिलांनी केला आहे.
सोसायटीमधील हलगर्जीपणा चिमुकल्यांचा जीवावर बेत आहे. एप्रिल महिन्यात वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथी विकास सिटी या सोसायटीत खेळणार्या अडीच वर्षीय आदित्य केवट या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
What's Your Reaction?






