मुंबई, 25 जुलै 2025 : रेल्वे मंत्रालयाच्या नवरत्न पीएसयू IRCTC ने 14 ऑगस्ट 2025 पासून दादर स्थानकाहून अयोध्या–प्रयागराज सह काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 8 रात्री, 9 दिवसांची ही सर्वसमावेशक यात्रा वाराणसी, अयोध्या व प्रयागराज येथील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देईल. यात आहेत:

  • ट्रेन क्रमांक 01027 दादर–वाराणसी स्पेशल मध्ये चार्टर्ड 2AC कोच, परतीचा प्रवास 01026 प्रयागराज–दादर स्पेशल ने

  • आरामदायी AC हॉटेलमध्ये निवास, नाश्ता व जेवण

  • AC बसने दर्शनीय स्थळांना भेट

  • प्रवास विमा तसेच काशी विश्वनाथ मंदिर, राम जन्मभूमी, हनुमानगढ़ी, त्रिवेणी संगम आदि दर्शन

जास्तीत जास्त ₹34,700 प्रति व्यक्ती (ट्रिपल ऑक्यूपन्सीमध्ये) या दरात उपलब्ध असलेले हे पॅकेज भक्तांसाठी सोयीचे, व्यवस्थीत व परवडणारे आहे. IRCTC पश्चिम विभाग, मुंबईचे समूह महाप्रबंधक गौरव झा म्हणतात, “ही यात्रा भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाला समर्पित असून सर्वांसाठी परवडणारी आहे.” फक्त 44 सीट्स आहेत. बुकिंगसाठी IRCTC पर्यटन वेबसाईट किंवा पश्चिम विभाग, मुंबई कार्यालय (8287931886 - WhatsApp/SMS) वर संपर्क करा.