एलटीटी-धनबाद विशेष गाड्यांचे 10 फेर्‍यांनी विस्तार

एलटीटी-धनबाद विशेष गाड्यांचे 10 फेर्‍यांनी विस्तार

मुंबई, 30 जून: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – धनबाद विशेष साप्ताहिक गाड्यांचे 10 अतिरिक्त फेर्‍यांनी विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानुसार, गाडी क्रमांक 03380 लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद साप्ताहिक विशेष, जी यापूर्वी 26 जून 2025 पर्यंत चालणार होती, आता 3 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीत आणखी 5 फेऱ्या धावणार आहे.

तसेच, गाडी क्रमांक 03379 धनबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, जी 24 जून 2025 पर्यंत चालणार होती, ती आता 1 जुलै ते 29 जुलै 2025 या कालावधीत 5 फेऱ्यांसह विस्तारित करण्यात आली आहे.

डब्यांची रचना:

  • 2 एसी 2-टियर

  • 2 एसी 3-टियर

  • 6 एसी 3-टियर इकोनॉमी

  • 6 स्लीपर

  • 4 सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे

  • 2 जनरेटर डबे

या गाडीच्या वेळा व थांबे जैसेच्या तसे राहतील. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow