ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई लोकल ठप्प, प्रवाशांचे हाल

ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई लोकल ठप्प, प्रवाशांचे हाल

मुंबई:मुंबईत आज(१० सप्टेंबर) पुन्हा एकदा लोकल सेवा ठप्प झाली. नेरुळ स्थानकाजवळ पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पनवेल ते वाशी दरम्यानची लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे पनवेल, बेलापूर, वाशी येथे प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासात अडचणी निर्माण झाल्या. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरची वाहतूक उशिराने सुरू होती, तर पनवेल ते ठाणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून चालत प्रवास केला.

मध्य रेल्वेवरही कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिट उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली, तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही उशिराने धावत होती.

मुंबईतील लाखो प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यात आणि विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यात उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow