कुर्ला उड्डाणपुलाच्या कामात लक्षणीय प्रगती; सीएसएमटी-कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्ग प्रकल्पाला वेग

मुंबई, ८ मे २०२५: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या (१७.५० किमी) विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत लक्षणीय प्रगती झाली आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाढत्या रेल्वे वाहतुकीला हातभार लावणारा असून, त्याअंतर्गत कुर्ला-परळ (१०.१ किमी) दरम्यान नव्या रेल्वेमार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे.
प्रस्तावित नव्या मार्गांकरिता, विद्यमान हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म ७ आणि ८ तोडण्यात येत असून, रेल्वे वाहतूक नव्याने उभारण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड फ्लायओव्हर डेकवर वळवण्यात येणार आहे. एकूण १३३९ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलामध्ये सीएसएमटीकडील ४१३ मीटरचा रॅम्प, पनवेलकडील ४२२ मीटरचा रॅम्प आणि ५०४ मीटरचा सपाट भाग आहे. यामध्ये नवीन स्टेशन इमारतीचाही समावेश आहे.
पूर्व-पश्चिम दिशेतील पादचाऱ्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी, विद्यमान पादचारी पूल (FOB) कमी करून त्याच्या जागी टिळकनगर टोकापर्यंत एकत्र जोडणारा स्कायवॉक तयार केला जात आहे.
६ महिन्यांतील प्रगती:
-
पीएससी गर्डर कास्टिंग: १० नग
-
डेक स्लॅब कास्टिंग: ९ स्पॅन
-
पिअर बांधकाम: ६ नग
-
पिअर कॅप बांधकाम: २ नग
-
पीएससी गर्डर स्ट्रेसिंग: ६४ (२४+४०)
-
गर्डर लाँचिंग: २० नग
-
पाईल फाउंडेशन कास्टिंग: १४२ नग
या कामांसाठी दररोज सुमारे ५० कामगार कार्यरत असून, रेडी-मिक्स काँक्रीट आणि ३५० टन क्षमतेच्या क्रेनचा वापर केला जात आहे.
शीव आरओबी अपडेट:
पादचाऱ्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी, या पुलाचा ५०% भाग तोडण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जमीन संपादन व पुनर्वसन:
कुर्ला-परळ मार्गासाठी आवश्यक असलेल्या १.०१३ हेक्टरपैकी:
-
०.५८४७ हेक्टर जमीन मे २०२५ पर्यंत रेल्वेच्या ताब्यात येणार
-
०.२६५ हेक्टर आधीच ताब्यात
-
उर्वरित ०.४३९ हेक्टर जमीन संपादनासाठी प्रक्रिया सुरू
या प्रकल्पात SPARC NGO आणि BSES यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
What's Your Reaction?






