तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती सुमारे २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण

तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती सुमारे २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण
तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती सुमारे २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ण

पवई येथे आरे वसाहती जवळच्या गौतम नगर परिसरात १८०० मिलिमीटर व्यासाची तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमूने सुमारे २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर  २४ ऑगस्ट २०२४ दुपारी दीड वाजेच्या सुमारास पूर्ण केली आहे. काल दुपारपासून आणि नंतर रात्रभर आणि आज पुन्हा दिवसा अखंड कार्यरत राहून तसेच आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत त्याचप्रमाणे पावसाच्या सरी झेलत महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी - कामगार यांनी जलवाहिनी दुरुस्तीची कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली. दुरुस्तीनंतर एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागाचा २४ ऑगस्ट २०२४ सायंकाळपासून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow