तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बोईसर: बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवर झालेल्या अमानुष शारीरिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातील तारापूर मध्ये देखील एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती आणि शारीरिक लगट करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

तारापूर पोलीस स्टेशन हद्दीत कुटुंबियासमवेत राहणारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय इसमाने शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश करीत मुलीचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा. संध्याकाळी मुलीचे आई वडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितल्यावर पालकांनी तातडीने तारापूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत बालकांचे लैंगिक शोषण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करीत शनिवारी रात्री अटक केली आहे. रविवारी सकाळी आरोपीला पालघर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow