दत्तक घेतलेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण दांपत्यावर गुन्हा दाखल

मुंबई: अवघ्या ३ महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेल्या ७ आणि ३ वर्षांच्या चिमुकल्यांना एका दांपत्याने अमानुष मारहाण केल्याची घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. शेजार्यांनी या प्रकाराची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला दिल्यानंतर या मुलांची सुटका करण्यात आली. या मारहाणीत एका मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. आचोळे पोलिसांनी दापंत्याला अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील विणा सरस्वती इमारती मध्ये सचिन पोरे आणि कविता पोरे हे दांपत्य राहतात. सचिन पोरे खासजी कंपनीत काम करतो तर त्याची पत्नी कविता ही गृहीणी आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी अभिषेक (७ वर्ष ८ महिने) आणि राजेश (३ वर्ष ८ महिने) या मुलांना दत्तक घेतलं होतं. मात्र ते या दोन्ही मुलांना माराहण करत असायचे. मुलांच्या ओरडण्याचा, किंचालण्याचा आवाज सतत येत होता.
शेजार्यांनी विचारणा केली असता पोरे दांपत्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही मध्ये पडायचं नाही असं खडसावलं होते. परंतु दररोज रात्री मुलांच्या रडण्याचा आणि त्यांना माराहण केल्याचा आवाज येत असल्याने शेजारी अस्वस्थ झाले होते. या प्रकरणी मग शेजाऱ्यांनी पालघर जिल्हा महिला बाल विकास आघाडीच्या १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क करूम माहिती दिली. त्यानुसार चाईल्ड हेल्पलाईन विभागाच्या पथकाने पोरे दांपत्याच्या घरी भेट दिली. त्यावेळी मुले जखमी अवस्थेत आढळली. मुले अभ्यास करत नाहीत, इतर मुलांसारखे नाहीत म्हणून मारहाण केल्याचे त्यांनी कबुली दिली. पीडित मुलांच्या हाता पायांवर नखांचे ओरखडे होते. हात सुजलेला होता.
७ वर्षाच्या अभिषेकचा हात फ्रॅक्चर झाला होता. याप्रकरणी जिल्हा बालविकास विभागाचे पर्यवेक्षक राजेश भालिंगे यांनी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोरे दांपत्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७ (२) व बाल न्याय (मुलांची काळजी व संऱक्षण अधिनियम) २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या मुलांची वैद्यकीय चाचणी करून उपचार करण्यात आले आहेत. मुले आता सुरक्षित असून त्यांना पालघरच्या उमरोळी येथील सुश्रुषा गृहात ठेवण्यात आले आहे. या दांपत्याला ही मुले पुन्हा देण्यात येणार नाही. तसेच त्यांना भविष्यात मुले दत्तक घेता येणार नाही, असे राजेश भालिंगे यांनी सांगतिले पोलिसांनी केले दुर्लक्ष अखेर शेजार्यांनी या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी मुले दत्तक घेतली आहे. ते मुलांचे पालक आहेत. जाऊ द्या असे सांगत त्यांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या लोकांची बोळवण केली. आचोळे पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर मुलांची तेव्हाच सुटका झाली असती. आचोळे पोलिसांच्या या असंवेदनशीलतेविरोधात संताप व्यक्त होत आहे
What's Your Reaction?






