दिनांक २६.९.२०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहिर.

दिनांक २६.९.२०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहिर.

पालघर:जा.क्र. जि.आ.व्य.प्रा./ शाळांना सुट्टी/१२३/२०२४

वाचले

दिनांक २५/०९/२०२४

१. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५

२. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील शासन परिपत्रक क्र. संकिर्ण- २०१९/प्र.क्र.१९९/एसडी-२ दिनांक ०२/०८/२०१९

३. राज्य परिपत्रक क्र. संकिर्ण-२०१९/प्र.क्र. १९९/एसडी-२ दि. २३/१२/२०१९

४. विभागीय उपसंचालक मुंबई यांचेकडील पत्रक्र. सिउर्स/माध्यमिक/संकिर्ण/२०२२/७०७७, दि.१३/०७/२०२२

५. भारतीय हवामान विभाग मुंबई यांचेकडील पूर्वसूचना दिनांक २५.९.२०२४.

आदेश:-

ज्याअर्थी, उक्त नमुद अ.क्र. ४ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-

त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५/०९/२०२४ रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा

(Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. वरील सर्व बाबी तसेच सर्व जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना दि. २६/०९/२०२४ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे.

त्याअर्थी, मी, गोविंद बोडके, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय दिनांक

०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २६/०९/२०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे,

उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी. सदरहू आदेश आज दिनांक २५/०९/२०२४ रोजी माझे सहीने दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,

पालघर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow