पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; २६ सप्टेंबर रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; २६ सप्टेंबर रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पालघर: पालघर जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला असून, जिल्ह्यात २६ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy to Very Heavy Rainfall) होण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच सर्व आश्रमशाळा व महाविद्यालये २६ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, भविष्यातील परिस्थितीनुसार अधिक निर्णय घेतले जातील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow