प्रगतीचं जलाशय: देहरजी प्रकल्पाची ८०% कामे पूर्ण, कोकणसाठी जलसुरक्षेचं नवं आश्वासन
मुंबई, १७ मे २०२५: पलघर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी देहरजी मध्यम सिंचन प्रकल्प आता ८०% पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व MMRDA अध्यक्ष मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या देखरेखीखाली हा महत्त्वाचा जलसाठा प्रकल्प आकार घेत आहे.
देहरजी प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये:
-
स्थान: देहरजी नदी (वैतरणा नदीची उपनदी), सुकसाळे गावाजवळ, ता. विक्रमगड, जि. पालघर
-
प्रकार: माती व वीटबंद धरण, गेट्स असलेला स्पिलवे
-
साठवण क्षमता: ९५.६० दशलक्ष घनमीटर (Mcum)
-
उपयोगी पाणीसाठा: ९३.२२ Mcum (२५५ MLD)
-
धरणाची लांबी व उंची: २४५० मीटर लांब, ७१.६० मीटर उंच
-
स्पिलवे गेट्स: १२ मी x ६.५ मी मापाचे ४ गेट्स
हा प्रकल्प कोकण सिंचन विकास महामंडळ (KIDC) मार्फत ₹२,५९९.१५ कोटींच्या MMRDA आर्थिक मदतीने राबवण्यात येत आहे. धरणाच्या जलसाठ्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सध्या तांत्रिक सल्लागारांमार्फत सर्वेक्षण व क्षेत्रीय कामे सुरू आहेत.
पाणीवाटप योजना:
एकूण २५५ MLD पाण्यातून:
-
१९० MLD - वसई-विरार महानगरपालिका (VVMC)
-
१५ MLD - मार्गातील ग्रामीण भागांसाठी
-
५० MLD - सिडको (CIDCO), पालघर विभागासाठी
नेत्यांची प्रतिक्रिया:
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
“देहरजी मध्यम प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासाचा एक मैलाचा दगड आहे. या प्रकल्पामुळे पालघर व परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा सुनिश्चित होईल. MMRDA आणि KIDC यांनी केलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो.”
मा. उपमुख्यमंत्री व MMRDA अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले:
“हा प्रकल्प ग्रामीण व नागरी पाणीपुरवठा क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणेल. MMRDA आणि KIDC यांची भागीदारी हे सरकारच्या जलसुरक्षेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, MMRDA यांनी सांगितले:
“देहरजी प्रकल्प हा केवळ जलसाठा प्रकल्प नसून, कोकणातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा उपक्रम आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना म्हणून याकडे पाहिले जात आहे.”
शाश्वत भविष्यासाठी टप्पा:
२०२७ पर्यंत पूर्ण होणारा देहरजी प्रकल्प, कोकण विभागातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करेल. वसई-विरारसह पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?






