बांगलादेशात आज पहाटे रस्ता अपघात, पाच ठार, २७ हून अधिक जखमी

बांगलादेशात आज पहाटे रस्ता अपघात, पाच ठार, २७ हून अधिक जखमी

ढाका:बांगलादेशात आज पहाटे झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. फरीदपूरमधील फरीदपूर-खुलना महामार्गावरील मलिकपूर येथे हा अपघात झाला. दोन बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 27 हून अधिक जण जखमी झाले

करीमपूर हायवे पोलिस स्टेशनचे प्रभारी एमडी सलाउद्दीन चौधरी यांनी सांगितले की,ग्रीन एक्स्प्रेस नावाची प्रवासी बस ढाकामधील अब्दुल्लापूरहून झेनैदहला जात होती,असे ढाका ट्रिब्यूनने वृत्त दिले. श्यामनगर (सातखीरा) कडून येणाऱ्या खगराचरी परिवहनच्या प्रवासी बसला तिची धडक बसली.सर्व मृत हे खागराचरी परिवहन बसचे प्रवासी आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी २७ जणांना बंगबंधू शेख मुजीब मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow