भाईंदर: भाईंदर पूर्वेतील गोडदेवगाव येथील अभिनव विद्यामंदिर शाळेच्या मागे, इंदिरा गांधी उद्यानाजवळ आज दुपारी सुमारे 2 वाजता एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. मृतदेहाजवळ एक काळी बॅग सापडली असून, ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पुढील तपास सुरू आहे.