भाजपा, काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची वसईत प्रचाराकडे पाठ

भाजपा, काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची वसईत प्रचाराकडे पाठ

वसई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अगदी काही तास शिल्लक असण्यापूर्वी वसई मतदारसंघात राज्यातील दोन मोठ्या पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचाराला दांडी मारल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत व्यग्रह असूनही महायुतीच्या उमेदवारांसाठी ते राज्यभर प्रचारसभा घेत आहेत त्यातही महायुतीच्या भाजप उमेदवारांसाठी ते विशेष मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे.  मात्र राज्यातील बडे नेते वसई स्नेहा दुबे यांच्या प्रचारार्थ अनुपस्थित राहिल्याचे दिसत आहे.  त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारासाठी राज्यातील पक्षाचा मोठा नेता आला नाही. 

मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे.  निवडणूक प्रचारासाठी फारच कमी वेळ उरल्याने नेत्यांची धावपळ होत आहे त्यामुळे प्रचाराला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही असे फडणवीस या व्हिडिओत म्हणाले.  या चित्रपटाच्या आधारे भाईंदर मध्ये प्रचार केला जात आहे एका बाजूला असे असले तरी वसईत गेले काही दिवस महाराष्ट्रा बाहेरील भाजप नेत्यांनी विविध सभांच्या निमित्ताने हजेरी लावली आहे.                                                                                               

वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना खुश करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय पर्यटन व पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या सभेचे आयोजन वसईत करण्यात आले होते.  वसई आणि नालासोपारा मतदारसंघातील मराठी मतदारांचा भाजपला विसर पडल्याचे दिसून येत आहे. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनीही उपस्थिती लावली.  भाजपचे खासदार रवी किशन यांचाही रोड शो झाला असे असूनही राज्यातील नेत्यांनी दुबे यांच्या प्रचारासाठी पाठ फिरवल्याचे चित्र आहे या ठिकाणी काँग्रेसचा राज्यातील एकही नेता फिरकला नाही देशातील मोठ्या पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी  प्रचारात पाठ फिरवली असली तरी कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे चित्र आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow