वसईत राडा ! भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, हितेद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

विरार - विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. येथे भाजपकडून पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला. यावेळी भाजप - बविआ कार्यकर्ते भिडले. विनोद तावडेंना रंगेहाथ पकडलं आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा सुरु आहे. जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाहीत, तोवर इथून हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
पैसे वाटप आणि कार्यकर्त्यांची मिटींग कशी घेऊ शकतात? पोलीस आणि इलेक्शन कमिशन काही कारवाई करेल असेल वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली. तावडे 5 कोटी रुपये घेऊन येणार असे मला सांगण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय.
मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. नाहीतर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबत इथेच राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन त्यांनी बोलावं, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
What's Your Reaction?






