महापालिकेच्या मान्सूनपूर्व डीपक्लीन ड्राईव्ह मोहिमेला भव्य सुरुवात

भाईंदर : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने युद्धपातळीवर मान्सूनपूर्व डीपक्लीन ड्राईव्ह मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकापासून करण्यात आला असून, त्यांच्या बलिदानास श्रद्धांजली वाहत मोहिमेला एक वेगळा भावनिक स्पर्श देण्यात आला.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये या मोहिमेचा शुभारंभ महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. पहाटेच्या सत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक स्वच्छता शपथ घेतली. त्यानंतर आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या गाडीच्या साहाय्याने शहीद स्मारकाची स्वच्छता केली.
मोहिमेचे ठळक वैशिष्ट्ये:
-
पाच स्वच्छता पथकांची निर्मिती करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामे वाटून देण्यात आली.
-
मुख्य व अंतर्गत रस्त्यांची, दुभाजकांची, बसस्थानकांची, शौचालयांची, पुतळ्यांची व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली.
-
७,००० किलो धूळ, माती आणि रॅबिट, तसेच २,५०० किलो सुका कचरा गोळा करण्यात आला.
-
रस्त्यालगत झाडांची छाटणी करून २,५०० किलो जैविक कचरा उचलण्यात आला.
-
६५ ठिकाणी चिटकवलेले स्टिकर्स हटवण्यात आले आणि थुंकलेली ठिकाणे स्वच्छ करण्यात आली.
-
सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की, "प्रत्येक नागरिकाने आपल्या सोसायटी, कार्यालय, शाळा, महाविद्यालय व परिसराची जबाबदारी स्वीकारून या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा."
ही मोहिम केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?






