दहा वर्षाच्या मुलीवर 68 वर्षाच्या नराधमांने केला लैंगिक अत्याचार : गुड टच बॅड टच च्या कार्यक्रमामधून घटना आली समोर 

दहा वर्षाच्या मुलीवर 68 वर्षाच्या नराधमांने केला लैंगिक अत्याचार :  गुड टच बॅड टच च्या कार्यक्रमामधून घटना आली समोर 

मुंबईः बदलापूर येथील चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.या घटनेनंतर राज्यातील अनेक भागातील महिला आणि लहान मुलीवर घटना समोर येताना दिसत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील खडकवासला परिसरातील शाळेत गुड टच बॅड टच चा कार्यक्रमा दरम्यान 10 वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. 68 वर्षीय नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले.यामुळे खडकवासला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
            68 वयचा दिलीप नामदेव मते (खडकवासला) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील 10 वर्षीय पीडित मुलगी शुक्रवारी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी दिलीप मते याने तुला खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवून जवळील रूम मध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या घटनेबाबत पीडित मुलीने घरी कोणालाही सांगितले नाही.दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेल्यावर,शाळेमध्ये गुड टच बॅड टच चा कार्यक्रम होता. त्यावेळी शिक्षक प्रत्येक मुलीशी संवाद साधत होते. त्या दरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितल्यावर आरोपी दिलीप मते विरोधात हवेली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देताच,आरोपीला अटक करण्यात आली आहे.तसेच अधिक तपास हवेली पोलिस करित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow