मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक फलकांची दुरवस्था, नागरिकांची मागणी नवीन फलक लावण्याची

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक फलकांची दुरवस्था, नागरिकांची मागणी नवीन फलक लावण्याची

वसई, 13 जून: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी दिशा दर्शक फलकांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर हे फलक गायब झाल्यामुळे प्रवाशांना मार्गदर्शन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वसई पूर्वेच्या भागातून जाणारा या महामार्गाने मुंबई, ठाणे, पाघर आणि गुजरातसारख्या महत्त्वाच्या भागांना जोडले आहे. त्यामुळे दररोज हजारो लोक या मार्गावर प्रवास करत आहेत, आणि त्यांना दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिशा दर्शक फलकांवर योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक ठिकाणी ते खराब झाले आहेत. विशेषतः वर्सोवा पुलाच्या दिशेने, पाघरच्या दिशेने आणि चिंचोटी, वसई फाटा, विरार फाटा यासह इतर ठिकाणी फलक तुटलेले किंवा खराब अवस्थेत आहेत. काही ठिकाणांवर हे फलक गायब देखील झाले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मार्गदर्शन मिळत नाही.

या मार्गावर नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये दिशादर्शक फलकांच्या अभावावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांनी सांगितले की, या फलकांच्या आधारे नागरिकांना ठिकाणांची माहिती मिळते, आणि विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणारे व्यक्ती यासाठी हे फलक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा ठिकाणी नवीन दिशा दर्शक फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुने फलक बदलून नवीन फलक लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे, आणि लवकरच नवीन दिशा दर्शक फलक रस्त्यावर लावले जाणार आहेत.

राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले की, फलकांची दुरवस्था दूर करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे लवकरच या महामार्गावर दिशा दर्शक फलकांची संख्या वाढवली जाईल आणि प्रवाशांना अधिक सोयीची माहिती मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow