वसई तहसिलदार कार्यालयात महापुरुषांच्या तसबीरी अंधारात

वसई:शासकीय कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा अनिवार्य आहेत. या प्रतिमांचा आदर व रख रखाव याची संपूर्ण जबाबदारी सदर कार्यालयाच्या व्यवस्थापनाची असते. असे असतानाही वसई तहसीलदार कार्यालयातील तसबीरी अंधारात ठेवाण्यात आल्याने तहसिल प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे. सध्या इथे ५३ तसबीरी आहेत.
यापूर्वीच सदर कार्यालया बाहेर प्रांगणात भारताचा ध्वज दररोज फडकवणे आवश्यक असताना, त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. याबाबत अधिकारी वर्गाला विचारणा केली असता, ध्वज फडकवणे व त्याचा रख रखाव करणे यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे सदर कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना वर्षातुन केवळ दोन वेळा स्वातंत्र्य दिनी ,प्रजाकसत्ताक दिनीच भारताचा तिरंगा दिसून येतो. ध्वज संहिते नुसार आता घरोघर तिरंगा लावण्याची तजवीज कायद्यात करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. असे असताना शासकीय कार्यालयातच ध्वज लावण्यात प्रशासन उदासीन दिसून येते. यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबरोबरच तहसिलदार कार्यालयातील प्रतिक्षालयात महापुरुषांचे फोटो अंधारात ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.
या दालनात आपल्या विविध प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेक पक्षकार नागरिक, समाजसेवक, वकील, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांची दिवसभर ये-जा सुरु असते. तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या प्रतिक्षालयाचा आधार घेतात. येथील एका भागातील विजेचे दिवे , पंखे काही महिन्या पासून नादुरुस्त आहेत. याबाबत अभ्यंगतांनी तक्रारी देऊनही त्याची दखल घेतलेली नाही. परिणामी राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून शहीद भगत सिंह, छत्रपती शिवाजी महाराज, लोकश्री शाहू महाराज, साने गुरुजी, सरदार पटेल, इत्यादी ३६ महापुरुषांच्या तसबीरी अंधारात ठेवल्या आहेत. तहसिलदार याची दखल घेतील का? असा प्रश्न काही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ध्वज फडकवण्या बाबत तहसिलदार अविनाश कोष्टी यांना विचारणा केली असता, याकरता मनुष्य बळ नाही. त्यामुळे ही तजवीज करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
What's Your Reaction?






