वसई तहसिलदारांची भूमि अभिलेख विभागाला नोटीस: जागा खाली करण्याचे आदेश

वसई :वसई तहसीलदार कार्यालयातील नगर भूमापन विभागाची बेकायदेशीर वीज खंडित प्रकरणी दखल घेत तहसीलदार विनोद धोत्रे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वीच नगर भूमापन विभागाची बेकायदेशीर वीज जोडणी महावितरण कार्यालयाने तोडली होती.
तहसीलदारांनी बजावलेल्या नोटीसी मधून वस्तुस्थिती विशद करत तहसीलदार कार्यालयातील जागा तात्काळ खाली करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच वास्तव्य बेकायदेशीर रित्या असल्याचे सिद्ध झाले आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार संवर्गाची तीन पदे कार्यरत आहेत. त्यांनाच बसण्याकरता जागा शिल्लक राहिलेली नाही. भूमी अभिलेख हे स्वतंत्र कार्यालय असून त्यांना त्यांची जागा आहे.
असे असताना या कार्यालयाचा नगर भूमापन विभाग तहसीलदार कार्यालयामध्ये मागील काही वर्षांपासून ठाण मांडून आहे. तहसीलदार वसई यांनी दिलेल्या पत्रानुसार तहसीलदार कार्यालयाची वीज सदर विभाग वापरत आहे. या वीज देयकाचा भार तहसील कार्यालयावर पडत असल्याचे म्हटले आहे.
आगामी काळात हा मुद्दा ऑडिटमध्ये उपस्थित झाल्यास भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोठ्या रकमेची वसुली निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे बेकायदेशीररित्या घेतलेली वीज जोडणी बंद करण्याची सूचना या पत्रातून करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






