वसई येथील बोगस डॉक्टरविरोधात पालिकेची कारवाई

वसई येथील बोगस डॉक्टरविरोधात पालिकेची कारवाई

विरार:वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात अवैध (बोगस) वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वेळवेळी शोध मोहीम राबविण्यात येत असून दोषी आढळल्यास पोलिसांची मदत घेऊन अशा अवैध वैद्यकीय वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. याकरिता अनिलकुमार पवार आयुक्त तथा प्रशासक वसई-विरार महानगर पालिका यांनी अवैध (बोगस) वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत (जा. क्र. व.वि.श.म./वै.आ. वि/339/2024) 03/05/2024)) रोजी अन्वये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना लेखी आदेश दिलेले आहेत. 

त्यानुसार 06/09/2024 रोजी दुपारी 01.00 वा. चे सुमारास  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- सातिवली वसई पूर्व येथील आमचे एरिया सर्व्हे करत असतांना बालाजी क्लिनिक गाळा नं.02 सागर मंथन इंडस्टीयलसमोर राजवली रोड, भोयदापाडा वसई पुर्व ता. वसई, जि. पालघर पिन कोड 401208 येथील रामचंद्र रामदुर यादव ( 64) वर्ष या डॉक्टराकडे कोणतीही डिग्री नसताना, ते क्लिनीक चालवत आहे अशी खात्री झाली असता सदरची माहिती फोनद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांना दिली असता त्यांनी सदर क्लिनिकवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

याकरिता वालीव पोलीस ठाणे येथील पोलिसांची मदत घेऊन ना. प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीनिवासराव धुधमल आणि त्यांचा स्टाफ सुरज धारासिंग पवार, सोनाली कृष्णा पाटील व पोलीस स्टाफ असे दुपारी 01.40 वा.चे सुमारास बालाजी क्लिनिक गाळा नं.02 सागर मंथन इंडस्ट्रीयल समोर राजवली रोड, भोयदापाडा वसई पूर्व, जि. पालघर पिन कोड-401208 सदर दवाखान्यात डॉ. आरविंद कुमार आर. यादव यांचे नावे फलक लावण्यात आलेला होता.  रामचंद्र रामदुर यादव याच्याकडे इयता बारावी (विज्ञान), सहा. परिचारक याचे शिक्षण घेतले असल्याचे समजले. कोणतीही वैद्य डिग्री नसल्याचे आढळून आले. आणि दवाखान्यात इन्जेक्शन्स, आय. व्हि. सेट व इतर अॅलोपॅथी औषधे आढळून आली. तसेच सदर हॉस्पीटलमधील डॉ. आरविंद कुमार आर. यादव हजर नसतांना रामचंद्र रामदुर यादव हे एका रुग्णास औषधोपचार करुन त्यास इंजेक्शन देत असतांना मिळून आले. सदर रामचंद्र रामदुर यादव यांचेवर वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या परिसरात असे अवैध (बोगस)वैद्यकीय व्यवसायिक असल्याचे निदर्शनास आल्यास लगेचच जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी, असे आवाहन वसई-विरार महापालिकेने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow