वसईत केळी पिकवण्यासाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर; नागरिकांची आरोग्याशी खेळणी

विरार:वसई-विरार परिसरात अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. यापूर्वी बनावट पनीर, दही, मिठाई यासारख्या खाद्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याचे प्रकार उघडकीस आले होते, आणि आता वसईतील सुप्रसिद्ध केळ्यांवर रासायनिक पद्धतीने पिकवण्याचे आरोप समोर आले आहेत.
या केळी पिकवण्यासाठी इथिलीन गॅस वापरला जात आहे. साधारणत: या गॅसचा वापर केळी पिकवण्यासाठी तीन ते चार दिवस घेतो, पण अत्यधिक प्रमाणात गॅस वापरल्याने केवळ 1 ते 2 दिवसांतच केळी तयार केली जातात. या कृत्रिम पद्धतीने तयार होणाऱ्या केळ्यांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
वसई - विरार, नायगाव, भाईंदर आणि मुंबईतील काही बाजारपेठांमध्ये या केळ्यांची विक्री केली जाते. यासाठी वखारीत 100 ते 150 पेट्या शीतगृहात ठेवून इथिलीन गॅसचा फवारणी केली जाते. शीतगृहात 13 ते 15 डिग्री तापमानाखाली केळी ठेवून त्या पिकवण्याचे काम केलं जातं.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इथिलीन गॅसाचे प्रमाण योग्य असावे, अन्यथा त्या फळांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक होऊ शकतो. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर मिठाई आणि फळांची विक्री वाढते, आणि अशा वेळी दुकानदार रासायनिक पद्धतीने फळ पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.
अशा प्रकारच्या भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने योग्य कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांकडून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
What's Your Reaction?






