वसई : धुळीमुळे शहराच्या प्रदूषणात वाढ; वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास

वसई - खड्डेयुक्त रस्ते बुंजवण्यासाठी वापरात आणलेली ग्रीट पावडर, माती, खडी वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे बाहेर पडून हवेत मिसळून वाहनचालक व नागरिकांना धुलीकणांचा त्रास सहन करावा लागत आहे. हे धूळीकण नाका-तोंडात जाऊन नागरिकांना सर्दी-खोकल्यासारखे आजार तसेच धुलीकणांचामुळे श्वसनाच्या आजारात वाढ होऊ लागली आहे. तशातच ऋतूबदलामुळे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेत थंडी तर दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या धुळप्रदुषणामुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या आजारांमुळे ते दवाखान्यात गर्दी करू लागले आहेत. खड्डेयुक्त रस्त्यांना दगड माती व ग्रीट पावडरचा लेप वाहनांच्या वर्दळीमुळे बाहेर पडून मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे तर रस्त्यावर धुळीचे थर साचत असून त्याचा वाहनचालकांना नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. वाहनचालक व नागरिकांच्या नाका-तोंडात धूळ जाऊन श्वास घेण्यास त्रास होणे, जळजळ होणे, अंगाला खाज सुटणे असे प्रकार उद्भवू लागले आहेत. त्यामुळे सध्या मास्कची मागणी वाढली आहे. धुळधाणीमुळे अनेकजण मास्कचा वापर करत आहेत. मात्र तरीही वाढत्या धुळीच्या प्रदुषणाचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. अजुनही ग्रामीण भागात तर रस्ते खड्डेयुक्त असून नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. अशात वातावरणीय बदलामुळे मास्कची मागणी वाढली आहे.
What's Your Reaction?






