वसई-विरार महापालिकेकडून मॅरेथॉन फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

विरार - वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेमध्ये महापालिकेने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाचे पूर्ण नाव, स्पर्धकाचा निवासी पत्ता, स्पर्धकाचा मोबाईल क्रमांक या माहितीसह फोटोग्राफर्सनी टिपलेले निवडक पाच फोटो महानगरपालिकेच्या vvcmcsportsgmail.com या ईमेल वर १४ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवावे.
फोटोग्राफी स्पर्धेचे नियम आणि सामान्य माहिती.
ही स्पर्धा सर्वांसाठी असुन सहभागींना कमाल 5 फोटो पाठवायचे आहेत, फोटो 1980 x 1020 असावेत; पिक्सेल 300 DPI, कमाल आकार 2MB प्रति फोटो, फोटोचा आकार 1020 पिक्सेल असावा, अंतिम मुदत १४ डिसेंबर २०२४ हा आहे. केवळ ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि क्रॉप करता येणार आहेत. स्पर्धकांच्या तपशीलांसह फोटो vvmcsports@gmail.com वर ईमेल करावेत, तसेच स्पर्धेबाबत वसई विरार शहर महानगरपालिकेचा निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेत सादर केलेल्या फोटोंचे अधिकार वसई विरार शहर महानगरपालिकेकडे राहतील. त्यासोबतच महापालिकेने वेळोवेळी या फोटोचा वापर केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येणार नाही असेही नियमांमध्ये नमूद केले आहे. तसेच स्पर्धकाला या सर्व अटी व शर्तीं मान्य आहेत व या अटी व शर्तींविरुद्ध न्यायालयात अपील करणार नाही असे मान्य करून फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. फोटोग्राफी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धकांना vvcmcsports@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.
What's Your Reaction?






