वसई – विद्यावर्धिनीचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी VNPS 2025 या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सृजनशील संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर केले. स्पर्धेचे आयोजन प्रामुख्याने IEEE, ISA, CSI, NSDC, ISHRAE, IETE, VMEA, CESA, ISHRAE AND IGBC यांसारख्या जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संबंधित विद्यार्थी आणि सल्लागार प्राध्यापकांच्या सहकार्याने करण्यात आले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या सभागृहात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती वंदना यांनी करण्यात आले.यानंतर VNPS 2025 चे संयोजक डॉ. उदय असोलेकर , प्राचार्य डॉ. राकेश हिमते आणि डीन ऑफ अकॅडेमिक्स डॉ. विकास गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप बसुमंतरी सर , श्री वैजनाथ आडमुठे सर श्री हिरा शंकर सर हे उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये एकूण पाच विभागांमध्ये प्रकल्पांचे वर्गीकरण करण्यात आले होते, ज्यांचे परीक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांनी केले. या परिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पांबाबत मौलिक अभिप्राय आणि तांत्रिक मार्गदर्शन प्रदान केले. स्पर्धेची सांगता संध्याकाळी ५ वाजता बक्षीस समारंभाने झाली, जिथे विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विकास वर्तक, खजिनदार श्री. हसमुखभाई शाह आणि जॉइंट डायरेक्टर श्री. विशाल सावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.