वसई - प्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे यांच्या वसईवरील चित्रांचे प्रदर्शन जी.जी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्यात आले आले. या प्रदर्शनात वसईतील किल्ला, मंदिरे, चर्च, जुने वाडे, वसई पूर्वेकडील पर्वतरांगा, वसईचे गत काळातील निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, कोळी जीवन पद्धती इ. चित्रांचा समावेश आहे. या निमित्ताने चित्रांच्या माध्यमातून वसई कशी दिसते हे पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. एकाच दालनामध्ये ही सर्व चित्र पाहता येणार आहेत. कलाप्रेमींनी या चित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन गोंधळे यांनी केले आहे.
वसई गावात राहणारे चित्रकार सुभाष गोंधळे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतले तर नोकरी व कालांतराने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जहांगीर आर्ट गॅलेरी, नेहरू सेंटरसह अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते.
वसईत भरविण्यात आलेले चित्र प्रदर्शन जी.जी महाविद्यालय कमिटी, प्राचार्य सोमनाथ विभुते, फा. थॉमस लोपीस, आणि कुरियन मॅडम यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
Previous
Article