अंबरनाथमध्ये मनसेचे आंदोलन; महाराष्ट्र बँकेतील अमराठी मॅनेजरविरुद्ध विरोध

अंबरनाथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बँकेतील अमराठी शाखा व्यवस्थापकावर तीव्र विरोध केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत गोंधळ घालून शाखा व्यवस्थापकावर मराठी न बोलण्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते, "मुंबईत येऊन आमच्या आथापनांत सांगता मराठी बोलणार नाही, कानफटीतच बसणार. उद्यापासून कामाला लागा. महाराष्ट्रातील त्येक बँकेत, आथापनेत मराठी वापरली जाते का नाही ते बघा." या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथमधील महाराष्ट्र बँकेतील शाखा व्यवस्थापकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
अमराठी शाखा व्यवस्थापकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांचा पारा चढला. शाखा व्यवस्थापकाने उलट उरं (रडून) प्रतिसाद दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. मनसेने व्यवस्थापकाला कठोर इशारा दिला, "मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जा."
शाखा व्यवस्थापकाने या विरोधावर प्रतिक्रिया दिली, "आम्ही सार्वजनिक सेवक आहोत. देशात कुठेही जाऊन काम करू शकतो. कोणतीही भाषा शिकायला वेळ लागतो. उद्या तामिळनाडूत गेलो तर तामिळ शिकायला लागेल." त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी विचारले, "या मॅनेजरला अंबरनाथला दीड वर्ष झाले आहे. अजून किती वेळ लागणार मराठी शिकायला?"
मनसेने स्पष्ट केले की, "आम्ही कोणालाही मराठी भाषा दुर्लक्षित करण्याची परवानगी देणार नाही. महाराष्ट्राच्या ओळखीत मराठी भाषा महत्त्वाची आहे."
या घटनेनंतर अंबरनाथ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. बँक प्रशासनाने परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेने या विषयावर पुढील कारवाईसाठी तयारी दाखवली आहे.
What's Your Reaction?






