मनसेने दाखवली कडक भूमिका: खिडकीतून झांकणाऱ्या आरोपीची धुलाई, पोलिसांच्या ताब्यात दिलं

मिरा-भाईंदर/महाराष्ट्र: मिरा-भाईंदर पश्चिमेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने खिडकीतून झांकून एका लहान मुलीला आंघोळ करत असताना पाहण्याचा घृणास्पद प्रकार केला. मुलीच्या आईने सावधगिरी बाळगून घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला, ज्यात आरोपीच्या अश्लील कृत्यांचा पुरावा मिळाला.

सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर, मुलीच्या आईने मनसे कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. मनसे महिला सेनेच्या प्रमुख वैशाली येरुंडकर आणि त्यांच्या टीमने त्वरीत कारवाई करत आरोपीचा शोध घेतला. मंगळवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडून त्याची चांगली धुलाई केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी आरोपीला अटक करून भारतीय दंड विधानाच्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने समाजात मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. मनसेच्या जलद कारवाईमुळे विकृत मानसिकतेच्या लोकांना कडक संदेश मिळाला आहे.

Watch full video on Below link:-

https://www.instagram.com/reel/DAn2it2Jbjm/?igsh=MW9xZWNobndodWtmeA==

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow