आयआरसीटीसीची 'अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रा' 19 जुलै व 5 ऑगस्टपासून सुरू

आयआरसीटीसीची 'अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रा' 19 जुलै व 5 ऑगस्टपासून सुरू

मुंबई, 18 जून 2025 | प्रसिद्धीपत्रक क्र.: 2025/6/2 — रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील नवरत्न कंपनी IRCTC ने ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही यात्रा सोलापूरहून 19 जुलै आणि मडगावहून 5 ऑगस्ट रोजी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे सुरू होईल.

पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक श्री गौरव झा यांनी सांगितले की, ही यात्रा भक्तांसाठी अतिशय सोयीस्कर, सुरक्षित व परवडणारी असून यात हॉटेल निवास, भोजन, बसद्वारे दर्शन, मार्गदर्शक, विमा व आरामदायक रेल्वे प्रवास यांचा समावेश आहे. सोलापूरहून दरडोई ₹22,760 आणि मडगावहून ₹23,880 पासून सुरू होणारी ही संपूर्ण पॅकेज यात्रा आहे.

भारत गौरव ट्रेन मध्ये स्लीपर, एसी थर्ड व एसी सेकंड टियर डबे असून, सीसीटीव्ही, इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑनबोर्ड पँट्रीद्वारे ताजं जेवण दिलं जातं.

बुकिंगसाठी www.irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा 8287931886 या क्रमांकावर WhatsApp/SMS करा.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow