तरुणीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबियांकडून तिच्या पतीवर हल्ला

विरार - विरारमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याने तरुणाने तिच्या पतीवर हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्लयात संजय पाटील हा तरुण गाम्भीर जखमी झाला आहे. या विरोधात विरार पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि मानसी यांनी नुकताच प्रेम विवाह केला होता. मात्र हा विवाह मानसी यांचा भाऊ दीप पाटील व त्यांच्या कुटुंबाला मान्य नव्हता हाच राग मनात धरून दीप पाटील यांनी संजय यांच्यावर हल्ला केला याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संजय यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संजय हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय यांनी याविषयीची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर विरार पोलिसांनी कारवाई करत दीप पाटील आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?






