थंडीच्या फॅशनवर आता कोरियन वेब सिरीजची छाप

थंडीच्या फॅशनवर आता कोरियन वेब सिरीजची छाप

वसई- सध्या ओटीटीवर कोरियन बेवसिरीजना पसंती मिळत असल्याने कोरियन संस्कृतीची छाप थंडीच्या विविध पोशाखांवर दिसून येत आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ऑनलाईन बाजारात सर्वत्र फॉर्मल, कॅज्युअल, पार्टी वेअर, फॉर्मल थंडीच्या पोषाखांची विविधता पाहायला मिळत आहे. 

सध्या मुंबईत आणि ठाणे, वसई परिसरात थंडीची चाहुल लागली आहे आणि ऑनलाईन-ऑफलाईन बाजार थंडीच्या पोशाखांनी फुलला आहे. ओटीटीवर कोरियन बेवसिरीज भारतात लोकप्रिय आहेत. त्यामुळे कोरिअन म्युझिक बँड्स, कोरिअन चित्रपट-मालिका, खादयपदार्थ आदींवर कोरियन संस्कृतीची छाप दिसून येत होते. हे के-पॉप अर्थात कोरिअन पॉप्युलर कल्चर आता थंडीच्या पेहरावातही दिसू लागले आहे. सध्या बाजारात लोकरीच्या कापडापासून बनवलेले ओव्हरसाईज कोट्स जॅकेट्स तसेच टिशर्ट स्टाईल स्वेटर, कॉर्ड् सेट्स आदीमध्ये कोरिअन सिरीज, सिनेमांमधील डिझाइन दिसून येत आहेत. यात युनिसेक्स पोषाख अधिक पाहायला मिळत आहेत. कोरिअन पद्धतीच्या डिझाइन्स असलेल्या पोषाखांची किंमत अगदी ४५० रुपयांपासून ते तीन हजारांपर्यंत आहे. यात रचना (पॅटर्न), नाममुद्रा (ब्रँड), आकारानुसार (साईज) नुसार किंमती बदलतात. 

तर दुसरीकडे आशियाई आणि भारतीय पद्धतीचे प्रिंट्स, नक्षीकाम केलेले कुर्ते, वन पीस ड्रेस, लोकरीचे स्टेटमेंट स्वेटर्स आदी देखील पाहायला मिळत आहेत. याच्या किंमती ७०० रुपयांपासून पुढे सुरू होतात. हिवाळ्याबरोबर इतर मोसमातही वापरू शकतो असे सिंथेटीक लेदर जॅकेट्स, हुडीज, बमर स्वेट शर्ट्स, स्लीम फीट झीपर, डेनिम शर्ट जॅकेट्स आदीही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. या पोशाखांच्या किंमती अगदी ३०० रुपयांपासून पुढे सुरू होतात. काही वर्षांपूर्वी आलेली स्वेटर टॉपची फॅशन अजूनही कायम असून यात क्रॉप स्वेटर टॉप हा प्रकार आलेला आहे. हे टॉप २०० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. हे कपडे मिंत्रा, ॲमेझॉन, स्टाईल कोरिअन, रस्ट ऑरेंज तर एचएनएम, झारा, वेस्टसाइड, फॉरेव्हर २१ आदी सुपरमार्केटमध्ये तसेच कुलाबा कॉजवे, वांद्रे हिल रोड, ईर्ला मार्केट आणि वसईच्या विविध बाजारात उपलब्ध आहेत.

ऑनलाईन बाजारात कानटोप्यांचे भन्नाट प्रकार, रंग, डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. इअर कफ, कानपट्टी, कानटोपी आणि कानटोपीला जोडलेला स्कार्फ, शोल्डर जॅकेट, गळापट्टी आदी कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत. यांच्या किंमती साधारण ३०० रुपयांपासून सुरू होतात. 

थंडीचा ऋतू आणि फॅशन 

एरव्ही स्टोल किंवा स्कार्फ हे धुळीपासून, प्रदूषणापासून कव्हर करण्यासाठी वापरले जातात. मात्र थंडीच्या दिवसांत मानेभोवती गुंडाळून शरिराचे तापमान संतुलित करण्यासाठी याचा वापर होतो आणि फॅशनसाठीही. युट्यूब, इन्स्टाग्रॅम आदी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर स्कार्फ कोणकोणत्या पद्धतीने गुंडाळून स्टेटमेंट लूक बनवता येईल याच्या पद्धती शिकवल्या जातात, तसेच सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या पद्धती जनता अनुकरण करतानाही दिसते. सध्या बाजारात लोकर कापडासह सिथेंटीक कापडातही स्कार्फ मिळतात यांच्या किंमती १५० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow