कार्बनमोनॉक्साई वायू प्राशन करून तरूणाची आत्महत्या

वसई - वसईतील एका २७ तरुणाने कार्बनमोनोक्साईड वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केल्याचा आगळावेगळा प्रकार बुधवारी उघडकीस आला. श्रेय अग्रवाल असे या तरुणाचे नाव आहे. कामण येथील स्पॅनिश व्हिला मधील बंगल्यात त्याचा मृतदेह सिलेंडरसोबत बांधलेला आढळला.
श्रेय अग्रवाल हा कामणच्या स्पॅनिश व्हिला येथील ‘क्लस्टर ०९’ या बंगल्यात मागील एक वर्षांपासून भाड्याने रहात होता. दोन दिवसांपासून संपर्क होत नसल्याने श्रेयच्या बहिणीने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे तक्रार केली होती. मुंबई गुन्हे शाखेने त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते वसईच्या कामण येथे निघाले. नायगाव पोलिसांनी माहिती काढून या बंगल्यात पोहोचले आणि त्यांना धक्का बसला. दारातच सावधगिरीची सुचना देणारी चिठ्ठी लावलेली आढळली. संपूर्ण घरात कार्बनमोनॉक्साईड पसरला असून दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल असा इशारा दिला होता.
अग्निशमन दलाने पीपीई किट घालून हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या घरात प्रवेश केला. श्रेयने घरातील सर्व विद्युत स्वीच बंद केले होते तसेच सुताराकरवी खिडक्यांना प्लाय लावून बंद केले होते. त्याने हाताला दोन कार्बनमोनॉक्साईडचे सिलेंडर लावून हेल्मेट घातले होते. या सिलेंडर मधील वायू त्याने न्युबीलायझरच्या मदतीने प्राशन करून आत्महत्या केली. घरात त्याने गंभीर आजाराने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी भींतीवर चिकटवून ठेवली होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली. त्याच्या घरात ५ कार्बनमोनॉक्साईडचे सिलेंडर आढळले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रेय अग्रवाल याच्या बहिणीने मुंबई पोलिसांना श्रेयाचा फोन लागत नसून तो हरवला असल्याची तक्रार ई-मेल द्वारे केली होती. त्या तक्रारीवरून मुंबई क्राईम ब्रँच ने तपास केला असता त्याच शेवटचा लोकेशन वसईच्या चिंचोटी येथील होतं. त्याने जी ओला गाडी बुक केली होती ती वसईला आली होती.
त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता श्रेय हा विला नंबर 06 पेनिस नंबर या विल्याच्या वरच्या मजल्या वरच्या बेडरूम मध्ये मृत व्यक्ती आहे.
What's Your Reaction?






