नागपूर: नागपूर येथील दीक्षाभूमीवर 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. भारताच्या कानाकोपऱ्यापासून ते नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथून मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर आले होते. दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या पवित्र अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर प्रकाशाने न्हावून निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.नागपुरात 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने समता सैनिक दलाने संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत उत्कृष्ट पथसंचालन करून अनेकांचे लक्ष वेधले. पथसंचालनात प्रथम भिक्खू संघ, नंतर पंचशिलेचा ध्वज हाती घेतलेला युवक आणि त्याच्या मागे निळ्या गणवेशातील शेकडो भीम सैनिक चालत होते. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारिपुत्त, प्रकाश दर्शनिक, अशोक बोंदाडे, दीपक वाघमारे, पुरुषोत्तम संबोधी, किशोर चहांदे यांच्या मार्गदर्शनात आरबीआय चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धम्मक्रांती अभिवादन मार्च दीक्षाभूमीकडे निघाला. मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी, जनता चौक, सेंट्रल बाजार मार्गाने हा मार्च दीक्षाभूमी येथे पोहचला. या दरम्यान समता सैनिक दलाच्या शेकडो जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचालन केले. काठी, दांडपट्ट्याच्या कसरती करून लक्षही वेधले. दीक्षाभूमीवर पोहचताच जयबुद्ध-जयभीमच्या जय घोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. या मार्चमध्ये जापान, श्रीलंका येथील भन्तेही सहभागी झाले होते. मार्चमध्ये देशाच्या कानाकोपºयातून सहभागी झालेल्या सैनिकामध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. समता सैनिक दलाच्यावीने 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान कामठी रोड बुद्धभूमी येथे राष्ट्रीय धम्मक्रांती महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवरून हे सर्व सैनिक या महाशिबिरात सहभागी होतील.
नागपूर : दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी लोटला जनसागर
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
पावसाळ्याच्या तोंडावर मीठ उत्पादकांची आवरा-आवर; अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
सांगलीकोल्हापूर : मे महिन्यात...
नायगाव मध्ये ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कॅंटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार
मुंबईः बदलापूर येथील एक शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी...
Previous
Article