नालासोपारा : डॉ. हेमांगी करपे यांचा महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या पुरस्काराने सन्मान

नालासोपारा : डॉ. हेमांगी करपे यांचा महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सतीश भट्ट यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

विरार - वसई विरार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. हेमाली गोपाळ करपे यांना नुकताच महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या आयुरकॉन आयुर्वेद  एक्सलेंस अवॉर्ड 2025' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील गोविंदराव आदिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सतीश भट्ट यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन ही नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय आयुर्वेद महासंमेलनाची शाखा असून आयुर्वेद या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ. करपे या नालासोपारा येथील आयुर्वेद मेडिकल महाविद्यालयच्या माजी विद्यार्थिनी असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा आणि विरार परिसरामध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्वाचे काम करत असून रुग्णसेवा करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow