पालघर आणि बोईसर मतदारसंघातून जुनेच चेहेरे रिंगणात ?

पालघर:विधानसभा निवडणुकीचा उमेदवार अर्ज दाखल करण्याची 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पालघर विधानसभा क्षेत्रातून सध्या शिवसेनेतर्फे भाजपात असलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार श्रीनिवास वनगा हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर होऊ शकतात. तर बोईसर विधानसभा मतदार संघ हा ही पालघर जिह्यातील एक महत्वाचा मतदान संघ मानला जातो. महायुतीच्या झालेल्या जागा वाटपामुळे (शिवसेना) शिंदे गटाला ही जागा वर्ग झाली आहे. भाजपा मध्ये कार्यरत असलेले माजी आमदार विलास तरे यांची उमेदवारी निश्चित केली जाऊ शकते.
श्रीनिवास वनगा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?
पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गटात सामील झाले. मात्र पक्ष वाढीसाठीसाठी विशेष प्रयत्न त्यांच्याकडून केले गेले नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विषयी नाराजी आहे. राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार श्रीनिवास वनगा हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर होऊ शकतात.
What's Your Reaction?






