पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद फाटक अंधारात ओलांडताना जयपुर एक्सप्रेसचा धक्का; दोघांचा मृत्यू, एक जखमी

पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद फाटक अंधारात ओलांडताना जयपुर एक्सप्रेसचा धक्का; दोघांचा मृत्यू, एक जखमी

पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद असणाऱ्या फाटक अंधारात ओलांडताना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात एक सहकारी बचावला असून त्याला दुखापत झाली आहे. 

बोईसर पूर्वेला बेल्डी रॉड कंपनीत वेल्डिंग व इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील तीन तरुण सुट्टी निमित गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने जयपुर एक्सप्रेस या भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पालघरच्या माजी नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी यांनी दिली असून या तिघांपैकी एक तरुण लघुसंखेसाठी बाजूला गेल्याने अपघातात जखमी झाला. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृतांचा नावाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. काही दशकांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले असले तरीही पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करणे भाग पाडत आहे.
---
बंद रेल्वे फाटक अंधारात ओलांडताना जयपुर एक्सप्रेस ने धडक दिलेल्या दुर्घटनेत
मृतांची नावे :
सोनुराम अंदाजे (३५)
मोनुकुमार (१९)

जखमी:
अनुप पंडित (२०)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow