भाजप नेते निलेश राणे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार

भाजप नेते निलेश राणे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार

निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असून जिथूनमाझ्या राजकारणाची सुरुवात झाली त्याच पक्षात मला पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे निलेश राणे म्हणाले. उद्या कुडाळ येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.

पक्ष प्रवेश केल्यांनतर मालवण कुडाळ मतदारसंघातून शिंदे गटाच्या तिकिटावर निलेश राणे निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. निलेश राणे यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चाना उधाण आले असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येणाऱ्या या पक्ष प्रवेशानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावर याचा काय परिणाम होतो याच्याही शक्यता जनतेकडून वर्तवण्यात येत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow