महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल

महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल
विरार:वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल झाले असून आज दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी या वाहनाचे प्रात्यक्षिक महानगरपालिका मुख्यालय येथे परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेत दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी मा.आमदार श्री.हितेंद्र ठाकूर, मा.आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.आमदार श्री.राजेश पाटील, मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार (भा.प्र.से), मा. माजी खासदार श्री.बळीराम जाधव,  मा.माजी महापौर श्री.रुपेश जाधव, मा.परिवहन सभापती श्री.कल्पक पाटील, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या संरक्षणाकरिता खरेदी करण्यात आलेली ६४ मीटर उंच टर्न टेबल लॅडर ही अतिशय महत्वाची उपलब्धी आहे. या वाहनाची किंमत रक्कम रु.१२,३२,००,०००/- इतकी असून विशेषतः महानगरपालिका क्षेत्रातील उंच इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास या वाहनाच्या साहाय्याने तेथील आगीवर तात्काळ नियंत्रण आणता येणार आहे. तसेच दुर्घटना स्थळी लोकांना सुरक्षित रित्या रेस्क्यू करण्याचे कार्य देखील सहजरीत्या पार पाडू शकतो. सदर वाहन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे अद्यावत अतिशय महत्वाचे आग प्रतिबंधक व जीव संरक्षक वाहन आहे. हे वाहन मे.मॅगीरस जीएमबीएच या जर्मन कंपनीचे असून जागतिक बाजारपेठेतील अग्रगण्य Volvo कंपनीचे दर्जेदार उत्पन्न असलेले FM ४२० HP चेसीस EURO VI RIGHT HAND DRIVE चा सदर वाहन बांधणीकरिता वापर करण्यात आला आहे. सदर टर्न टेबल लॅडरवर जोडण्यात आलेल्या लिफ्ट मुळे रेस्क्यू ऑपरेशन अधिक क्षमतेने, संख्येने व गतीने करता येणे शक्य होते. मे.मॅगीरस जीएमबीएच या कंपनीचे इंजिनियर्स मार्फत सदर वाहनाच्या हाताळणीसंदर्भात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच सदर वाहनाच्या देखभाल दुरुस्ती करीता कंपनीचा १ इंजिनियर पुढील ५ वर्षाकरिता २४ तास उपलब्ध राहणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ६४ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल झाले असून शहरातील उंच इमारतींमध्ये आग लागण्याची दुर्घटना घडल्यास तेथील आगीवर तात्काळ नियंत्रण आणून तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या यंत्रणेचा वापर होणार आहे. या यंत्रणेमुळे रेस्क्यू ऑपरेशन अधिक क्षमतेने, संख्येने व गतीने करता येणे शक्य होणार आहे-अनिलकुमार पवार , आयुक्त (भा.प्र.से), वसई विरार शहर महानगरपालिका        
                                  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow