मिरा भाईंदरमध्ये विविध विकासकामांसाठी अडीच हजार झाडांचा बळी ?

मिरा भाईंदरमध्ये विविध विकासकामांसाठी अडीच हजार झाडांचा बळी ?

भाईंदर - मिरा-भाईंदर शहरात प्रदूषणाचे प्रमाण एकीकडे वाढत असतानाच आता विविध विकास कामांसाठी शहरातील अडीच हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे त्यामुळे पर्यावरणवाद्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे . मेट्रो कारशेडसह इतर विकासकामांसाठी प्रकल्पाच्या मार्गात येणारी झाडे हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. यातील काही झाडांना पुनर्रोपणाद्वारे पुन्हा जीवनदान मिळणार असल्याचा दावा केला जात असला तरीही हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. 

मिरा- भाईंदर दहिसर मेट्रो ९ व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ- अंधेरी मेट्रो ७ या प्रकल्पाकरिता भाईंदरच्या राई गावात कारशेड उभारले जाणार होते मात्र तेथील स्थनिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर आता हा प्रकल्प उत्तन डोंगरी येथील ६० एकर शासकीय जमिनीवर होणार असल्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कार्यवाही होऊन सदर जमिनीचा ताबा एमएमआरडीला देण्यात आलेला आहे. 

या जागेवर आता कारशेडचे काम लवकरच एमएमआरडीए कडून सुरु केले जाणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया ही राबविली जाणार आहे. या प्रकल्प मार्गात १ हजार ४०६ झाडे येत असून त्यातील ८३२ मोठी झाडे तोडली जाणार आहेत तर ५७४ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

सचिन तेंडुलकर मैदानात फुटबॉल टर्फसाठी तर सावित्रीबाई फुले उद्यानात सांडपाणी प्रकल्प तसेच नवघर तलावाजवळ भिंत उभारण्याचे काळ येत्या काळात महानगरपालिकेकडून केले जाणार आहे. या कामांचा परिणाम  १ हजार २९४ झाडांवर होणार असून तयारी ८४ झाडे तोडली जाणार असून १ हजार २१० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. 

विकासकामांमुळे झाडांवर परिणाम होणार असून पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे यासाठी वृक्षतोडी विरोधात अधिकाधिक नागरिकांनी आपल्या हरकती नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow