भाईंदर : कोल्हापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मीरा रोडच्या निरज जिवाजीराव पाटील याने सुवर्णपदक पटकावले. पॉवर लिफ्टिंग इंडियाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णं पदक मिळविल्या बद्दल त्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे, एल. आर. तिवारी कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या निरज ने ५३ किलो वजनी गट ज्युनियर कॅटेगरीत प्रथम स्थान पटकावित पूर्वीचा नॅशनल स्कॉट रेकॉर्ड मोडला. यापूर्वीही आयोजित पॉवर लिफ्टिंग स्पर्धामध्ये निरजने गौरवास्पद कामगिरी केली असून त्याला अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे हेमांगी पाटील यांनी सांगितले.  राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णं पदक मिळविल्याबद्दल माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी निरजचे अभिनंदन केले आहे.