वर्तक महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतर-महाविदयालयीन रायफल शूटिंग स्पर्धा: मुंबई आणि पालघर विभागातील स्पर्धकांचा मोठा सहभाग

वर्तक महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त  आंतर-महाविदयालयीन रायफल शूटिंग स्पर्धा: मुंबई आणि पालघर विभागातील स्पर्धकांचा मोठा सहभाग

वसई,हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त बुधवारी विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविदयालयात आंतर-महाविदयालयीन रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वर्तक महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा शूटिंग रेंजमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मुंबई व पालघर विभागातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या स्पर्धेला लाभला. पालघर परिसरातील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहता रायफल शूटिंग या क्रीडाप्रकाराला या परिसरात चांगली लोकप्रियता वाढली आहे, असे महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनीष तिरपुडे यांनी सांगितले.

स्पर्धेपूर्वी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनी उपस्थित खेळाडूना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मुले आणि मुलींसाठी १) १४ वर्षाखालील गट २) १७ वर्षाखालील गट ३) १९ वर्षाखालील गट ४) खुला गट अशा चार वयोगटामध्ये ही स्पर्धा झाली.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे आणि क्रमांक पुढील प्रमाणे:

१४ वर्षाखालील मुलींचा गट

  1. प्रथम क्रमांक: सायरी गणेश जाधव (सेंट फ्रान्सिस स्कूल)
  2. द्वितीय क्रमांक: जिरीका पंकज सिद्धपुरा (कार्मेलाइट कॉन्व्हेन्ट)
  3. तृतीय क्रमांक: मिशेल मॅथ्यू डिसिल्वा (कार्मेलाइट कॉन्व्हेन्ट)

१४ वर्षाखालील मुलांचा गट

  1. प्रथम क्रमांक: हर्ष संतोष सत्री (न्यू इंग्लिश स्कूल)
  2. द्वितीय क्रमांक: वैष्णव एकनाथ जाधव (न्यू इंग्लिश स्कूल)
  3. तृतीय क्रमांक: शिवानंद सच्चिदानंद पांडे (ट्री हाऊस)

१७ वर्षाखालील मुलींचा गट

  1. प्रथम क्रमांक: प्रांजली प्रफुल वाघमारे (उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक: महिषी योगेश पाटील (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: आयेशा आसिफ शेख (सेंट थॉमस बॅप्टिस्टा महाविद्यालय)

१७ वर्षाखालील मुलांचा गट

  1. प्रथम क्रमांक: लितेश संदीप सावंत (लिटल फ्लॉवर हायस्कूल)
  2. द्वितीय क्रमांक: मीत हरेश्वर म्हात्रे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: नैतिक राजीव चौधरी (कार्मेलाइट कॉन्व्हेन्ट)

१९ वर्षाखालील मुलांचा गट

  1. प्रथम क्रमांक: शिवानी संजीवकुमार गुप्ता (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक: सृष्टी रामदास मेंढे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: ग्रीष्मा वैभव पाटील (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)

१९ वर्षाखालील मुलांचा गट

  1. प्रथम क्रमांक: हितेश चेतन जोगळे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक: सोहम राकेश कवळी (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: संदेश महादेव शेळके (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)

१९ वर्षावरील मुलींचा गट (खुला गट)

  1. प्रथम क्रमांक: प्रीतम रमेश साहू (विवा महाविद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक: साक्षी राजेंद्र जाधव (विवा महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: श्रेया अनिल जैस्वाल (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)

१९ वर्षावरील मुलांचा गट (खुला गट)

  1. प्रथम क्रमांक: दक्ष किशोर यशवंते (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक: आदित्य गोंड (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)
  3. तृतीय क्रमांक: सुजल विचारे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय)

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, उपप्राचार्य डॉ. दीपाक कत्रे, अंतर्गत दर्जा निश्चिती कक्षाचे प्रमुख डॉ. हिरानंद खंबायत आणि प्रबंधक श्री. दिलीप वर्तक यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow