वसई:वसई  जमीन सर्वेक्षण व मोजणीच्या माध्यमातून आपल्या भावना- दृष्टिकोन अगदी तंतोतंत सर्व्हेशिटवर व्यक्त करणारे वसईतील प्रसिद्ध मेसर्स. रे लँड सर्वेअर कंपनीचे मालक दिलीप सोनबा धोत्रे (वय 45 ) यांचे आज दि 3 ऑक्टोबर रोजी पहाटे कौल हेरिटेज सिटीतील राहत्या घरी हृदविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व गावी बंधू भगिनी  असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती.

दिलीप यांचे पार्थिव त्यांचे मूळ गावी पुणे जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे नेण्यात आले तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू अशोक धोत्रे यांनी सांगितले
दांडगा जनसंपर्क,नेहमी चेहऱ्यावर हास्य, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि सल्ला देण्यापेक्षा आपल्या कृतीतून कामाला सर्वप्रथम महत्त्व देणाऱ्या सर्वेअर दिलीप धोत्रे यांच्या आकस्मिक निधनाने वसईतील त्यांचे कौटुंबिक मित्र परिवार व व्यावसायिक ऋणानुबंध  असलेल्या तसेच त्यांच्या एकूणच व्यवसायाशी संबंधित  स्थापत्य (आर्किटेक्ट) आणि ग्रामीण व शहरी भागांतील  जमीन मालक व  विकासक तसेच राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना मोठा धक्का बसला असून, सर्वांनीच शोक व्यक्त केला आहे.

वसई सोबत मुंबई, ठाणे,पालघर ,नवी मुंबई पुणे,रायगड आदी भागांत त्यांच्या कामाचा पसारा होता, अर्थात आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असो खास करून वसई विरार चा मंजूर विकास आराखडा तयार करण्याच्या कामात ही त्यांचा सहभाग होता, या सर्व क्षेत्रातील जमीन मोजणी मधील 25 वर्षांहून अधिक अनुभवासह, ते खाजगी सर्वेक्षण व सर्वेअर ( मोजणी ) साठी प्रसिद्ध होते.
 
मागील दोन दशके झाली वसई रोड पश्चिमेला स्टेशन नजीक त्यांची मेसर्स. रे. लँड नावे त्यांची सर्वेअर / डिझाईन फर्म अस्तित्वात आहे.
  
दरम्यान धोत्रे यांनी वसई व मुंबईतील अनेक स्थापत्यशास्त्रातील दिग्गजां सोबत काम केले आणि त्याच्या मोजमाप व डिझाइन तत्त्वज्ञानाला आकार दिला. त्यांच्या तंतोतंत व अभ्यसु सर्वेक्षण व परिक्षण वृत्ती ने त्यांच्या व्यवसायाला एक आयाम मिळाला होता ज्यामुळे तोत्यांच्या  ग्राहकांना सर्वोत्तम परिणाम प्रदान करण्यास सक्षम झाला. 
परिणामी प्रशासन व व्यावसायिक मित्र तसेच जवळचे जिवलग मित्र व  कुटुंबवस्तल आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक तथा  नाती ,संस्कृती, परंपरा व सांस्कृतिक वारसा जपण्याची तळमळ असलेल्या दिलीप धोत्रे यांनी वसईत आपल्या कामाने उत्कृष्ट अशा भविष्याला आकार दिला होता 
एक दिलखुलास दोस्तीच्या दुनियेतील राजा आणि सकारात्मक विचारसरणीचा ज्याने पैशापेक्षा मानवतेला  किंमत दिली याखेरीज  वास्तुशिल्पीय लँडस्केपवर आपल्या निष्णात मोजणीच्या सर्वेक्षणाने प्रभाव टाकला, नक्किच सर्वेअर दिलीप धोत्रे यांचे योगदान  वास्तुविशारद,अभियंता व सर्वेअर क्षेत्रातील  पुढील पिढीला प्रेरणा देत राहील हीच त्यांना वसईकरांची भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.