वसईत विविध घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

वसई - वसई-विरार परिसरात विविध घटनांमध्ये तीन आत्महत्यांची नोंद झाली असून तीनही घटनांमध्ये आत्महत्या ही गळफास घेऊन करण्यात आलेली आहे. वसईतील वालीव फाट्याच्या लक्ष्मी इंड्रस्टीयल येथील मंगली कंपनीत राहणाऱ्या अंशू श्रीवास्तव (१८) या तरुणाने गळफास घेऊन आत्मत्या केली आहे. त्याला नवघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वालीव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दुसरी घटना नालासोपाऱ्यातील आंबेवाडी परिसरात घडली असून, येथील साई क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सागर नाईक (२८) या तरुणाने आत्महत्या केली आहे.
शनिवारी रात्री काही कारणामुळे घरातील छताला असेलल्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तिसऱ्या घटनेत वसई पश्चिमेच्या सांडोर गावातील मानभाटवाढी येथे राहणाऱ्या वृद्धाने आत्महत्या केली. विन्सेंट रिबेलो (७२) असे या वृद्धाचे नाव असून. त्यांनी रविवारी सकाळी दारू पिऊन नशेतच घराच्या मागील बाजूस असलेल्या फेब्रिकेशनच्या वर्कशॉपमधील शेडमध्ये असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरच्यांनी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत वसई पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून आत्महत्या हा आता एक गंभीर विषय होत चालल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून दिसून येत आहे.
What's Your Reaction?






