वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाजूची जिना २९ ऑगस्टपासून बंद; पश्चिम रेल्वेची माहिती

वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाजूची जिना २९ ऑगस्टपासून बंद; पश्चिम रेल्वेची माहिती

वसई, २९ ऑगस्ट :  पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरील दक्षिणेकडील जिना (दुसऱ्या उत्तर दिशेच्या पादचारी पुलाचा) २९ ऑगस्टपासून बंद केला जाणार आहे. स्थानक सुधारणा प्रकल्पाच्या अंतर्गत हा जिना तोडण्यात येणार असून, या ठिकाणी उंच डेक (Elevated Deck) बांधण्याचे पायाभूत काम सुरू आहे.

पश्चिम रेल्वेने गुरुवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा. "प्रवाशांनी दुसऱ्या उत्तर पादचारी पुलाचा उत्तर बाजूचा जिना आणि विद्यमान उत्तर पादचारी पुलाचा दक्षिण बाजूचा जिना वापरावा," असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हे काम सुरू असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी स्थलावर लावण्यात आलेल्या सूचना फलकांचे पालन करावे व स्टेशन परिसरात सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow