वसई विरार मधील क्रिकेटपटूंसाठी मुंबई क्रिकेट असोसिशिएशनचे विरार येथे शिबीर

विरार - वसई विरारमधील क्रिकेटमध्ये आवड असणाऱ्या तसेच ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे अशा मुलांसाठी मुंबई क्रिकेट असोसिशिएशने १३ ते १५ डिसेंबरदरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे. मुंबईला लागून असलेलया पश्चिम किनारपट्टीवरील मुलांमध्ये या खेळाविषयी कौशल्य शोधण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिशिएशने या शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी १३ डिसेंबरला विरार येथील साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर १४ वर्षाखालील, १४ डिसेंबरला १६ वर्षाखालील आणि १५ डिसेंबरला १९ वर्षाखालील वयोगटातील मुलांची निवड करण्यात येणार आहे. या निवड चाचणीत दहिसर ते विरारमधील मुलांची निवड करण्यात येणार आहे. या शिबिरामुळे दहिसर ते विरारदरम्यानच्या क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. शिबीरासाठी सकाळी साडेआठ वाजता हजर राहावे लागणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिशिएशनकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?






