वसई विरार महापालिकेच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद:स्वच्छ भारत अभियान स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
विरार : वसई विरार महापालिकेने स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे विजेते जाहीर करण्यात आले आहे. या विजेत्यांना मंगळवारी पार पडलेल्या सोहळ्यात मा.आयुक्तांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छता चॅम्पियन लघुपट, पथनाट्य, चित्रकला, स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आदी विविध स्पर्धांचा समावेश होता. शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर केले. या स्पर्धेसाठी *"मी स्वच्छ अभियानामध्ये सहभागी होईन, आपले शहर स्वच्छ ठेवीन" असे घोषवाक्य देण्यात आले होते. या स्पर्धांचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी वसईच्या वर्तक महाविद्यालयातील राजाणी सभागृहात विजेत्यांचा बक्षिस सोहळा पार पडला. यावेळी महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त नानासाहेब कामठे, सहा.आ
युक्त सुकदेव दरवेशी, सहा. आयुक्त विश्वनाथ तळेकर, कार्यकारी अभियंता प्रदिप पाचंगे, शिवसेनेचे विनायक निकम, माजी परिवहन सभापती भरत गुप्ता, ॲड पवनी यादव, शिवसेना नेते सुदेश चौधरी, भाजपचे शेखर धुरी, उत्तम कुमार, वर्तक महाविद्यालाचे प्राचार्य अरविंद उबाळे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव दिनेश कांबळे, विजय मांडवकर यांच्या हस्ते विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्वच्छ टेक्नोलॉजी आणि वेस्ट टू वेल्थ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात हिरा आर्ट अकादमीतर्फे 'नवस' ही एकांकिका तसेच दिंडी वारीची आणि वसईतील कोळी लोकनृत्य सादर करण्यात आली.स्वच्छतेची सुरवात घरापासून वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेची सुरवात आपल्या घरापासून करण्याचे आवाहन केले. दरवर्षी पालिका नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे डबे पुरवत असते. नागरिकांना देखील आता आपल्या घरातच ओला आणि सुका कचर्याचे वर्गीकरण करावे असे ते म्हणाले. माझी मुलगी देखील मला वाहनातून जात असताना कागदाचा तुकडा खाली टाकू देत नाही. तरुणांमध्ये स्वच्छतेची भावना रुजत असून ती समाधानाची बाब आहे, असे आयुक्त म्हणाले.
शालेय पथनाट्य स्पर्धेत विरारच्या एनपी शहा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत विरारच्या विवा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. लघुपट स्पर्धेत शाम राऊत प्रथम, भक्ती साळवी द्वितिय तर भारत शिरसाट तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. रांगोळी स्पर्धेत गणेश सालियन (प्रथम) अक्षय वहाळकर (द्वितिय) आणि सुरज तांडेल (तृतीय) हे विजेते ठरले. वॉल पेंटीग मध्ये दशरथ वरणकर (प्रथम), आदित्य कांबळे (द्वितिय) आणि प्रथमेश झवेरी (तृतीय) हे विजेते ठरले.
What's Your Reaction?






