वसई - गावांचा महापालिकेत समावेश केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत ३१ हजार ३८९ हरकती आणि सूचना आल्या होत्या. या सुनावणीसाठी ज्यांनी हरकती अर्ज सादर केले होते त्या अर्जदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आलाय होत्या. मात्र, हरकतींवरील सुनावणीला ग्रामस्थांनी थंड प्रतिसाद दिल्यानंतरआता ज्या अर्जदारांना काही कारणामुळे सुनावणीसाठी उपस्थित राहता आले नाही त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांच्याकडून आता पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच त्यासाठी तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून सोमवार २३ ते गुरुवार २६ अशी ३ दिवस ही सुनावणी होणार आहे. . 

वसई विरार शहर महानगरपालिकेमधील ५५ गावांपैकी वगळलेली २९ गावे महानगरपालिका हद्दीत पुनश्चः समाविष्ट करण्याबाबत १४ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. गावांचा महापालिकेत समावेश केल्यांतर १४ फेब्रुवारी २०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत ३१ हजार ३८९ हरकती आणि सूचना आल्या होत्या. या हरकती आणि सूचनांवर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जात आहे. ह्या सुनावणीचा कालावधी  १६ डिसेंबर ते २० डिसेंबर असा होता. 
 
मात्र, ही सुनावणी प्रक्रिया बेकायदेशीर आहे असा ग्रामस्थांनी आरोप करत या सुनावणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या सुनावणीसाठी ग्रामस्थांनी थंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ही सुनावणी सोमवार २३ डिसेंबर ते गुरुवार २५ डिसेंबर या कालावधीत ही सुनावणी होणार आहे. २५ डिसेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी सुनावणी होणार नाही.