२१ वर्षांनी पारधी गँगच्या सदस्याला अटक; MBVV पोलिसांची कारवाई

आरोपीचे नाव बाबुराव अण्णा काळे उर्फ बाब्या ( ५५) असून, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रांच्या साहाय्याने विरार पश्चिमेला असणाऱ्या आगाशी गावातील एका बंगल्यात ९ जानेवारी २००३ या दिवशी पहाटेच्या वेळी चोरी केली होती.

२१ वर्षांनी पारधी गँगच्या सदस्याला अटक; MBVV पोलिसांची कारवाई

मीरा भाईंदर -  तब्बल २१ वर्षे पोलिसांना चकवत कारवाई पासून दूर राहणाऱ्या पारधी गॅंगच्या एका सदस्याला अटक करण्यात मीरा-भाईंदर -वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या केंद्रीय गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला यश आले आहे. आरोपी हा दहशतवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या पारधी गॅंगचा सदस्य आहे. आरोपीचे नाव बाबुराब काळे असून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रांच्या साहाय्याने विरार पश्चिमेला असणाऱ्या आगाशी गावातील एका बंगल्यात  २००३ साली चोरी केली होती. 

२००३ मध्ये झालेले आगाशी चोरी प्रकरण काय ? 

२१ वर्षांपूर्वी ९ जानेवारी २००३ ला विरार पश्चिमेच्या आगाशी गावातील एका बंगल्यात चोरी झाली होती. पारधी गॅंग कडून ही चोरी करण्यात आली होती. शास्त्रांचा वापर करून पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या या चोरीत बाबुराव अण्णा काळे उर्फ बाब्या हा आरोपी होता. त्यावेळी दिड लाख किमतीचे  सोने चोरण्यात आले होते. 

२१ वर्षे पोलिसांना चकवत कारवाई पासून दूर राहिला आरोपी  

सराईत गुन्हेगार असेलला बाब्या  जवळजवळ २१ वर्षे फरार होता. पारधी गॅंग मधील अजून एक सदस्य राजेश सत्यवान पवार उर्फ सुचिनाथ याला २००५ मधेच अटक करण्यात आली होती.  मीरा-भाईंदर -वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या केंद्रीय गुन्हे प्रकटीकरण शाखेने जुन्या गुन्ह्यांचा पुन्हा तपास सुरु केल्यानंतर बाब्याविषयीची माहिती मिळताच त्यांनी त्वरित जालना येथे तपास सुरु केला. 

एक महिन्यांनंतर बाब्याला पार्तुल तालुक्यातील वालखेड या गावातून पकडण्यात आले. एक महिन्याच्या कालावधीत, आरोपीचा शोध घेणे तसेच, आरोपी आणि त्याच्या साथीदारांची नावे या सगळ्याविषयी खात्री केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. २००६ पासून ते २०२१ पर्यंत बाब्यावर यांसारख्या अजूनही १० प्रकारणांमध्ये जालना जिल्हा आणि  छत्रपती संभाजी नगर मध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आरोपीच्या मुलांनाही काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असून दोन्हीही  मुले सध्या फरार आहेत. 

ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक तसेच पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमकडून करण्यात आली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow